टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री निती टेलरला सोशल मीडिायवर ट्रोल केलं जातंय.

नितीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, 2014 मध्ये आलेल्या कैसी ये यारियां आया था या शोपासून मला ट्रोल केले जात आहे.

मी नेहमीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. पण तरीही ट्रोल्स मला वाईट पद्धतीने फॉलो करत आहेत, असे नितीने म्हटले आहे.

हे सर्व इतके पुढे गेले की ट्रोल्सने माझ्या एडिट फोटोंमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांना टॅग करणे सुरू केले, अशी नाराजी तिने व्यक्त केलीय.

'मी ट्रोलला उत्तर देत नाही, पण त्यांनी माझ्या कुटुंबाला अशा गोष्टी पाठवायला सुरुवात केली ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, असे तिने सांगितले.

महिनाभरापासून हे घडत असून वेडेपणा आहे. हे लोक अतिशय घाणेरडी भाषा वापरत असल्याचे निती म्हणते.

या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या अभिनेत्रीच्या मनात अनेकदा सोशल मीडिया सोडण्याचा विचार येत असल्याचे नितीने सांगितले.

निती म्हणते मी स्वतःला सांगत असते की हे फक्त पडद्यामागचे लोक आहेत. कधीकधी मला सोशल मीडिया सोडावासा वाटतो आणि त्याशिवाय आयुष्य जगता यावे पण आता हा माझ्या कामाचा भाग आहे.