अभिनेत्री रश्मिका मंधाना हिने खूप कमी कालावधील चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या रश्मिका आता राष्ट्रीय क्रश बनली आहे. रश्मिका मंधानाला नॅशनल क्रशचा टॅग का देण्यात आला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तर त्याची देखील अनेक कारणे आहेत. रश्मिकाने प्रचंड कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. भारतासह जगभरात रश्मिकाचे लाखो चाहते आहेत. विशेष म्हणजे तिला चित्रपट क्षेत्रातच यायचे नव्हते. परंतु, एक टर्निंग प्वाईंट मिळाला आणि तिचं सगळ आयुष्यच बदललं. रश्मिकाला चित्रपटात नाही तर शैक्षणिक क्षेत्रात करियर करायचे होते. त्याचवेळी तिच्या एका शिक्षकाने फ्रेश फेससाठी तिचे नाव दिले. नाविलाजाने रश्मिलाला स्पर्धेत सहभागी व्हावे लागले. याच्याच माध्यमातून तिने शीर्षक स्वतःच्या नावावर ठेवले आणि आपला पहिला चित्रपट देखील साइन केला. पहिला चित्रपट मिळाल्यानंतरही रश्मिकाला या क्षेत्रात आपण मागे पडेल असे वाटले.