उद्या आषाढी एकादशी... आषाढीनिमित्त केवळ पंढरीच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे.

आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी प्रत्येकालाच माथा टेकवण्याचा योग येत नाही.

पण प्रत्येक व्यक्ती या ना त्या मार्गाने पांडुरंगाची सेवा मात्र नक्की करतो.

अनुजा जोशी त्यापैकीच एक, तिने कुंचल्यातून तिची भक्ती सादर केली आहे

मातीच्या विटेवर अनुजा ने तिच्या मनातले पांडुरंग रेखाटले आहेत.

तिने पांडुरंगाला साक्षात पाहिलं नसलं तरी या विटेवरचे पांडुरंगच तिला भेटलेले आहेत.

अनुजाने आजवर बऱ्याच प्रकारच्या पेंटिंग केल्या आहेत.

विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आणि शेकडो मैलांची पायपीट करीत आषाढी सोहळ्यासाठी

पंढरपूरकडे (Pandharpur) निघालेले पालखी सोहळे आज पंढरीत प्रवेश करणार आहेत