झीरो | रिव्ह्यू | एबीपी माझा
सिनेमा हा दिग्दर्शकाचा असतो. म्हणूनच प्रत्येक सिनेमा कुणी बनवलाय हे पाहिलं जातं. म्हणजे, सिनेमा शाहरुखचा.. किंवा आमीरचा किंवा हृतिक रोशनचा असतोच. पण त्याही पलिकडे, त्यांना डायरेक्ट कोण करतंय यावर तो अवलंबून असतो. असो. शाहरुखबद्दल बोलायचं, तर त्याला त्याच्या छापातून मारुन मुटकून बाहेर काढणारे अत्यंत कमी दिग्दर्शक आहेत. म्हणजे, टिपिकल शाहरुख सोडून त्याला भूमिकेच्या चौकटीत नेण्यात यशस्वी झालेले सिनेमे होते स्वदेस, चक दे इंडिया, पहेली आदी. बाकी टिपिकल शाहरुख स्टाईल सिनेमे त्याने केलेच. यात ओम शांती ओम, चेन्नई एक्स्प्रेस अशा अनेक सिनेमांचा उल्लेख करता येईल. तर असा प्रकार असताना जेव्हा, झीरोसारखा विषय घेऊन शाहरुख आनंद एल राय यांना निवडतो तेव्हा आपल्या अपेक्षा उंचावतात.