Virat World Cup Kit | विश्वचषकासाठी विराटच्या किटमध्ये तीन नवीन बॅट्स | खेळ माझा | ABP Majha
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही विश्वचषकाच्या या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. विराटनं विश्वचषकासाठी खास तीन नवीन बॅट्स बनवून घेतल्या आहेत. या बॅटसह त्यानं नेट्समध्ये बराच वेळ सरावही केला.