Election Special | शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
प्रलंबित प्राध्यापक भरतीसाठी आचारसंहितेचा बागुलबुवा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी जबाबदार धरलं आहे. 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा विशेष कार्यक्रमात विनोद तावडे बोलत होते. कार्यक्रमात विनोद तावडेंनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. लोकसभेसाठी लागू झालेली आचारसंहिता प्राध्यापक भरतीसाठी अडसर ठरता कामा नये, असं मत विनोद तावडेंनी मांडलं. यासंदर्भात मी मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शालेय भरती प्रक्रिया आचारसंहितेआधी सुरु झाली आहे, त्यामुळे ती थांबण्याची गरज नाही. येत्या दोन-तीन दिवसात ही प्रक्रिया पुन्हा सुरु होईल, असं आश्वासन विनोद तावडेंनी यावेळी दिलं.