नवी मुंबई | वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मोसंबीचे लिलाव ठप्प
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या फळ मार्केटमध्ये मोसंबी खरेदीचे व्यवहार ठप्प झाले आहे. औरंगाबादहून ५० ते ६० शेतकऱ्यांनी मोसंबी विकण्यासाठी इथं आणली. मात्र काही मोसंबी खराब असल्याचं कारण देत व्यापाऱ्यांनी १० टक्के सूट देत ती विकत घेण्यास सुरुवात केली. याला शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर इथलं मोसंबी लिलाव ठप्प झाले.