वसई विरार : 30 तासांपासून बत्ती गुल, मोबाईल चार्ज करण्यासाठी स्टेशनवर झुंबड

Continues below advertisement

अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा असल्या तरी आता त्यात मोबाईल चार्जिंगही भर पडली आहे. सध्याच्या काळात एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे मोबाईल. पण मोबाईलसह तो चार्जिंगही आपली मूलभूत गरज बनली आहे.

मुसळधार पावसामुळे विरारमध्ये गेले 30 तास वीजपुरवठा नाही. त्यामुळे आज नागरिक जेव्हा विरार स्टेशनला पोहोचले, तेव्हा ट्रेन येत नव्हत्या. ट्रेनची वाट पाहण्याच्या वेळेचा सदुपयोग करत, नागरिकांनी विरार सब-वेमध्ये मोबाईल फोन चार्ज केला. सब-वेमध्ये फोन चार्ज करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram