तोंडी परीक्षा | विधानसभेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुलाखत | ABP Majha
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवणारा आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत असताना आठवले यांनी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला.