WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं

Continues below advertisement

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं

आपल्या रोजच्या संदेश वहनाचं साधन म्हणजे व्हॉट्सअॅप... त्यावरून आपल्याला दररोज हजारो संदेश येत असतील... यातील काही कामाचे, तर काही नुसतेच गुड मॉर्निंग, गुड नाईटवाले... पण अनेकदा एखादी लिंक क्लिक केली, तर तुमचं बँक खातं साफ होऊ शकतं... आपल्या रोजच्या संभाषणाचा एक अविभाज्य भाग...अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच व्हॉट्सॲप ही आपली एक मुलभूत गरज बनलीये...व्हॉट्सॲपवरचं हे वाढतं अवलंबित्व अनेकांना मोठ्या अडचणीत आणणारंही ठरलंय...त्यामुळेच गेल्या काही वर्षाच सायबर गुन्हेगारीतही झपाट्याने वाढ झालीये... याच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून स्कॅम करत अनेकांची आर्थिक फसवणूक करण्यात येते...त्यामुळेच व्हॉट्सॲप आता स्कॅम अलर्ट हे नवं फिचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे...पण आता हे स्कॅम मेसेज ओळखणं सोपं होणारे... कसं...अनोळखी व्यक्तीकडून आलेला मेसेज जर संभाव्य स्कॅमसारखा वाटत असेल, तर वापकर्त्याला त्याबाबत हे फिचर सुचित करेल... विशेष म्हणजे त्या मेसेजचं विश्लेषण हे तुमच्या डिव्हाईसवरच असल्यानं कोणतंही वैयक्तिक संभाषण सर्व्हरवर पाठवावं लागणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही स्कॅम अलर्ट हे फिचर वापरताय, याबाबत मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तिला कळू शकणार नाही.. बघुयात हा स्पेशल रिपोर्ट... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola