Google Pay : गुगल पेनं चुकन पाठवले 80 हजार रुपये, ज्यांनी खर्च केले त्यांच्यावर कारवाई नाही

Continues below advertisement

गुगल पेने अचानक आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावर कॅश बॅगच्या रिवॉर्ड स्वरुपात जवळपास ८०,००० रुपये पाठवलेत.. असे अचानक पैसे आल्यानं अनेकांना आनंद झाला खरा मात्र हा आनंद फार काळ टीकला नाही..  अनेकांना तर हे पैसे आपल्याला का मिळाले हेही कळाले नाही. गुगल पेच्या एका तांत्रिक चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला. जेंव्हा ही चूक गुगल पेच्या तांत्रिक विभागाच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी ही रक्कम लगेच मागे घेतली.तसंच या वापरकर्त्यांना गुगल पे नं एक मेल देखील केला.  या मेलमध्ये तुम्हाला खात्यावर आलेले पैसे परत करणं जर शक्य नसेल, तर ते पैसे तुमचे आहेत, असं म्हटलंय.. तसंच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचंही गुगल पेनं स्पष्ट केलंय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram