Loan App :पर्सनल लोन देणारे 3,500 अॅप अँड्रॉईडवरून काढले, नियमांची पुर्तता न केल्यानं गुगलची कारवाई
Continues below advertisement
पर्सनल लोन देणाऱ्या साडे तीन हजार अॅप्सवर गुगलनं बंदी घातली आहे. त्यामुळे हे अॅप्स आता अँड्रॉईडमधील प्ले-स्टोअरवर दिसणार नाहीत. रिझर्व बँकच्या अटी आणि गुगलचे नियम न पाळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.. अँड्रॉईडवर लोन अॅप सुरू करण्यासाठी रिझर्व बँकेचं प्रशस्तीपत्रक लागतं.. अनेक कंपन्यांनी ते गुगलकडे सादर केलं नाही. तसंच, एखाद्या लोन संस्थेकडून कर्ज मिळवून देणारं अॅप असेल, तर मूळ कंपनीकडून परवानगीचं पत्र गुगलकडे सादर करणं बंधनकारक आहे.. त्याची पुर्तताही अनेक अॅप्सनं केली नव्हती.. त्यामुळे, अशा अॅप्सपासून सावध राहा, असं आवाहन एबीपी माझा आपल्या प्रेक्षकांना करतंय.
Continues below advertisement