WTC Final 2023 : WTC फायनलच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, हेड आणि स्मिथची भागिदारी
Continues below advertisement
जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. लंडनच्या ओव्हल मैदानातल्या या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा पुरेपूर लाभ उठवून ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर तीन बाद ३२७ धावांची मजल मारली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 251 धावांची अभेद्य भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत नेलं. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी ट्रॅव्हिस हेड 146 धावांवर आणि स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर खेळत होता. भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
Continues below advertisement