Nisha Dahiya Safe : पैलवान निशा दहिया सुखरुप, नामसाधर्म्यामुळे गल्लत झाल्याची माहिती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंदीगड : भारताची उदयोन्मुख पैलवान निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात इसमांनी सोनिपतमध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची अफवा पसरली होती. आता त्यावर स्वत: निशा दहियाने खुलासा केला असून आपण सुरक्षित आहोत, आपल्याला काहीही झालं नसल्याचं सांगितलं आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन ही माहिती दिली आहे.
निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात इसमांनी सोनिपतमध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती गेल्या काही वेळेपूर्वी आली होती. हरियाणामधल्या सोनिपत येथील सुशीलकुमार रेसलिंग अॅकॅडमी परिसरात ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं होतं. या गोळाबारात निशाची आई धनपती याही गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांना रोहतकमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. आता या सर्व बातम्या अफवा असल्याचं निशा दहियाने स्पष्ट केलं आहे.