Thane Celebration IND vs PAK World Cup 2023: रोहित शर्माची कर्णधारास साजेशी मोठी खेळी,ठाण्यात जल्लोष
World Cup 2023 Points Table : विश्वचषकात सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. त्याशिवाय रनरेटही भारताचा भक्कम झाला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात कांगारुंचा पराभव केला होता. त्यानंतर अफगाणिस्तान संघाला अस्मान दाखवले होते. आज पाकिस्तान संघाला सात विकेटने चिरडले. मोठ्या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलच्या दिशेने पाऊल टाकले आहे. भारतीय संगाने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन मोठ्या संघाचा पराभव केला आहे. आता इंग्लंड, दक्षिण आफ्रिाक आणि न्यूझीलंड हे तीन कठीण पेपर बाकी आहेत. दरम्यान, पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ एकदम तळाशी आहे.