Ravichandran Ashwin : ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनचा भारताच्या पंधरा सदस्यीय विश्वचषक संघात समावेश
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनचा भारताच्या पंधरा सदस्यीय विश्वचषक संघात ऐनवेळी समावेश करण्यात आला आहे. डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेल हा अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळं त्याच्याऐवजी रवीचंद्रन अश्विनचा भारताच्या विश्चषक संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलला आशिया चषकातल्या बांगलादेशविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी अश्विननं तब्बल दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. त्या मालिकेतल्या दोन सामन्यांमध्ये अश्विननं चार विकेट्सही घेतल्या. पण या मालिकेदरम्यान अक्षर पटेल दुखापतीतून सावरला नाही. त्यामुळं अश्विनच्या ताज्या कामगिरीच्या निकषावर त्याची भारताच्या विश्वचषक संघात निवड करण्यात आली आहे.