New Zealand vs Pakistan : न्यूझीलंडकडून पाकिस्तानला विजयासाठी तब्बल 402 धावांचं मोठं आव्हान
Continues below advertisement
न्यूझीलंडनं पाकिस्तानला विजयासाठी तब्बल ४०२ धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान दिलं आहे. विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखायचं तर पाकिस्तानला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या आक्रमणावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. न्यूझीलंडनं ५० षटकांत सहा बाद ४०१ धावांची मजल मारली. सलामीचा डेवॉन कॉनवे ३५ धावांवर माघारी परतला, पण रचिन रवींद्र आणि कर्णधार केन विल्यमसननं दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडच्या डावाला मजबुती दिली. विल्यमसनचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं. पण रचिन रवींद्रनं शतक साजरं करून आपला दर्जा पुन्हा दाखवून दिला. विल्यमसननं ७९ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांसह ९५ धावांची खेळी उभारली. रचिन रवींद्रनं ९४ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह १०८ धावांची खेळी केली.
Continues below advertisement