IND vs NZ Semifinal :भारत आणि न्यूझीलंड संघात विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा सामना

Continues below advertisement

IND vs NZ Semifinal : वानखेडेवर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड द्वंव्द , भारत आणि न्यूझीलंड संघात विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा सामना , विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारताची न्यूझीलंडवर मात 
IND vs NZ, Wankhede Stadium Pitch Report: विश्वचषकातील सेमीफायनलच्या (World Cup 2023 Semi Final) सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. आज मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तसेच, हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. वानखेडे मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं आहे. या खेळपट्टीवर फलंदाज मोठे फटके सहज मारतात. मात्र गोलंदाजांसाठी आव्हान सोपं नसेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram