India vs Australia World Cup Final 2023 : विश्वचषकाचा उत्साह शिगेला,ओमकार राऊत, शिवाली न्यूजरूममध्ये

Continues below advertisement

Experts Opinion On IND vs AUS Final : रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही तासात मिळणार आहे..वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येतायत. त्याआधी अनेक दिग्गजांनी आजचा सामना कोण जिंकणार याचे भाकित केलेय.  ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याच्यामते आजच्या सामन्यात टीम इंडिया फेव्हरेट आहे. भारतीय संघ भन्नाट फॉर्मात आहे. ते चॅम्पियनसारखे खेळले आहेत. आजच्या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram