IND vs PAK World Cup 2023 : भारताचा पाकवर दणदणीत विजय , अहमदाबादमधून सामन्याचा थेट आढावा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माच्या भारतीय संघानं विश्वचषकाच्या रणांगणात पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून सलग तिसरा विजय साजरा केला. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सलग आठवा विजय ठरला. या विजयासह भारतानं पाकिस्तानवरच्या निर्विवाद वर्चस्वाची आपली परंपरा कायम राखली. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवरच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आज पाकिस्तानची अवघ्या १९१ धावांत दाणादाण उडवली. आणि तिथंच भारतानं निम्मी लढाई जिंकली. मग रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या ७७ धावांच्या भागिदारीनं भारताला विजयपथावर नेलं. रोहित शर्मानं ६३ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांसह ८६ धावांची मॅचविनिंग खेळी उभारली. श्रेयस अय्यरनं ६२ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी रचली. त्याआधी पाकिस्तानच्या डावात जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स भारतीय विजयात मोलाचं योगदान दिलं.