IND vs NZ Semifinal : नागपूरमध्ये क्रीडा प्रेमींचा उत्साह, मुजुमदार क्रिकेट मैदानातून आढावाABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Nov 2023 09:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIND vs NZ, Wankhede Stadium Pitch Report: विश्वचषकातील सेमीफायनलच्या (World Cup 2023 Semi Final) सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. आज मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तसेच, हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. वानखेडे मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं आहे. या खेळपट्टीवर फलंदाज मोठे फटके सहज मारतात. मात्र गोलंदाजांसाठी आव्हान सोपं नसेल.