BAN vs SL Match Report : बांगलादेशची श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात

BAN vs SL Match Report : बांगलादेशनं श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात करून, वन डे विश्वचषकात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं त्या दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती. या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशला विजयासाठी २८० धावांचं आव्हान दिलं होतं. नजमल हुसेन शान्तो आणि शाकिब अल हसननं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या १६९ धावांच्या भागिदारीच्या जोरावर बांगलादेशनं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. शान्तोनं ९० धावांची, तर शाकिबनं ८२ धावांची खेळी उभारली. त्याआधी, चरिथ असालंकानं झळकावलेल्या शतकानं श्रीलंकेला सर्व बाद २७९ धावांची मजल मारून दिली होती.  विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदाच श्रीलंकेचा पराभव केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola