IND vs WI : भारतीय संघाकडून वेस्ट विंडिजचा 96 धावांनी पराभव
अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विंडिजचा 96 धावांनी पराभव केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला आहे. रोहित शर्मा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच मालिका विजय आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट विडिंजला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले होते.