IND vs Pak : भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळं उर्वरित सामना आज होणार
Continues below advertisement
बातमी क्रीडा जगतातून.. भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या सुपर फोर सामन्यात मुसळधार पावसामुळं कालचा खेळ रद्द करण्यात आला होता. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, त्यावेळी भारतानं २४ षटकं आणि एका चेंडूत दोन बाद १४७ धावांची मजल मारली होती. आता त्याच धावसंख्येवरून भारताचा डाव आज दुपारी तीन वाजता पुढे सुरु होणारेय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं १२१ धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया रचला. रोहित शर्मानं ४९ चेंडूंत ५६ धावांची, तर शुभमन गिलनं ५२ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. पण ते दोघंही लागोपाठच्या षटकांमध्ये माघारी परतले. त्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुलनं भारताला दोन बाद १४७ अशी मजल मारून दिली.
Continues below advertisement