ICC T20 WC 2021 : ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकातून टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात, अफगाणिस्तानचा पराभव
abp majha web team
Updated at:
07 Nov 2021 07:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppICC T20 WC 2021, NZ vs AFG: टी-20 विश्वचषकातील 40 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाला धुळ चाखली. अबुधाबीच्या शेख जायद स्डेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) खेळण्यात आलेल्या सामन्यात आफगाणस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अफगाणिस्तानने घेतलेला निर्णय फसला. अफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 125 धावापर्यंत मजल मारता आली. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं अफगाणिस्तानवर 8 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या विजयामुळं भारताचं उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलंय. तर, या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने उपांत्य फेरीत धडक दिलीय.