T20 World Cup Cricket : T20 विश्वचषक जिंकण्याची भारताला संधी? ABP Majha

Continues below advertisement

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफलातून कामगिरी केली होती. भारताने सगल 10 सामने जिंकत जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाकडे वळवल्या होत्या. त्यात, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक झालं. मात्र, अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार रोहित शर्मासह कोट्यवधी भारतीयांचे डोळे विश्वविजयातील अंतिम सामन्यात पाणावले होते. मात्र, आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया विश्वविजयाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यामुळे, रोहित शर्मा गत टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढून भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

1 जूनपासून टी-20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होत आहे. त्यासाठी, बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. त्यामध्ये, रोहित शर्माकडेच संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे, गत 2023 मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम रोहित पुन्हा सज्ज होणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या माध्यमातून रोहितच्या संघात रोहित शर्मासह यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले आहे. तर, दुबे यालाही संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांना संधी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram