Sharad Pawar on India vs Pak : भारतीय संघाच्या पराभवानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया अशोभनीय : शरद पवार

Continues below advertisement

भारताचे महान सलामीवीर सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्षे झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आज गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्तानं गावस्कर यांना वानखेडे स्टेडियमवर कायमस्वरुपी कक्ष भेट देण्यात येणार आहे. त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावानं वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडचंही उद्घाटन करण्यात येणार आहे. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. या वेळी शरद पवार यांनी भारतीय संघाच्या पाकिस्तानकडून झालेल्या पराभवावर सुध्दा आपली भावना व्यक्त केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram