ABP News

Sanket Sagar : सांगलीचा वेटलिफ्टर संकेत सागरला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 55 गटात रौप्यपदक ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्राचा वेटलिफ्टर संकेत सरगरनं बर्मिंगहॅममधल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला. संकेत सरगरनं स्नॅचमध्ये 113 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो असं एकूण 248 किलो वजन उचललं. संकेत हा मूळचा महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्याचा आहे. संकेतला क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्यांदा वजन उचलताना दुखापत झाली. त्यामुळं त्याला दुसरा प्रयत्न करता आला नाही. परिणामी त्याची सुवर्णपदकासाठी प्रयत्न करण्याची संधी हुकली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram