Sangli : सांगलीचा खेळाडू Rohit Banne ची 'प्रो कबड्डी' मध्ये एंट्री ABP Majha

Continues below advertisement

देशातच नव्हे तर देशाबाहेरही 'ले पंगा' म्हणून दंगा करणाऱ्या 'प्रो कबड्डी' स्पर्धेत कबड्डीनगरी सांगलीचा खेळाडू रोहित बन्ने याला गतविजेत्या बंगाल वॉरिअर्स संघाने दहा लाखाची बोली लावून घेतले आहे. रोहित हा सांगलीतील मानांकित सम्राट व्यायाम मंडळाचा खेळाड आहे. तर प्रो कबड्डीत निवड झालेला तो जिल्हा पोलिस दलातील पहिला खेळाडू ठरला. प्रो कबड्डीमुळे या खेळाला पुन्हा एकदा बहर आला.  गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कबड्डीचा आठवा हंगाम होऊ शकला नाही. परंतू यंदा डिसेंबर महिन्यात प्रो कबड्डी स्पर्धा घेण्याची जय्यत तयारी झाली आहे. बेंगलोरमध्ये एकाच ठिकाणी सर्व सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. प्रो कबड्डीसाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच झाला. सांगली पोलिस दलाचा खेळाडू रोहित बन्ने याला दहा लाखांची बोली लावून घेण्यात आले. रोहित हा डिफेन्डर म्हणून गेल्या आठ ते दहा वर्षात नावारूपास आला आहे. २००७ मध्ये कुमार गट, २००८ ला विद्यापीठ संघात निवड झाली. २०१२ मध्ये बीच नॅशनलमध्ये तृतीय क्रमांक मिळवून दिला. पोलिस दलात भरती झाल्यानंतर राष्ट्रीय पोलिस स्पर्धेत राज्य संघाला दोनवेळा सुवर्णपदक मिळवून दिले. २०१९ ला वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघातून तो खेळला. २०१५ च्या महाराष्ट्र कबड्डी लीग स्पर्धेत सांगली रॉयल्सकडून खेळताना उपविजेतेपद मिळवून दिले. संघात उजव्या कोपऱ्यात संरक्षण करण्यात रोहितचे कौशल्य आहे. त्याचे कौशल्य हेरूनच गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने त्याला संघात घेतले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram