Sachin Tendulkar 50th Birthday Celebration : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची पन्नाशी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मुंबईत मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. मुंबईतल्या निवडक ४० क्रीडापत्रकारांसोबत सचिननं आज दुपारी आपला वाढदिवस साजरा केला. सचिन तेंडुलकर येत्या २४ एप्रिलला वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत आहे. सचिनच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला सोहळा क्रीडा पत्रकारांसाठी खूप खास ठरला. सचिननं त्याच्या २४ वर्षांच्या कारकीर्दीतल्या क्रीडा पत्रकारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर भाग्यवान क्रीडा पत्रकारांना त्यांनी कव्हर केलेल्या सचिनच्या एखाद्या सामन्याची किंवा त्यांच्या लाजवाब खेळीची आठवण सांगण्याची संधी देण्यात आली. आणि मग सचिननं क्रीडापत्रकारांसोबत दुपारच्या जेवणाचा आनंद घेतला, तो क्षण तर क्रीडा पत्रकारांना भविष्यासाठी नवं चैतन्य निर्माण करणारा ठरला. सचिन तेंडुलकरनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत शतकांचंही शतक साजरं केलं आहे.