Roger Federer रचा स्पर्धात्मक टेनिसला गुडबाय, गुडघेदुखीच्या त्रासामुळे निवृत्तीचा निर्णय : ABP Majha

Continues below advertisement

स्वित्झर्लंडचा महान टेनिसवीर रॉजर फेडररनं सर्वोच्च स्तरावरच्या स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ४१ वर्षांचा फेडररनं आजवरच्या कारकीर्दीत २० ग्रँड स्लॅम विजेतीपदांची कमाई केली आहे. पण गेल्या वर्षीच्या विम्बल्डननंतर तो स्पर्धात्मक टेनिसमध्ये सहभागी होऊ शकलेला नाही. त्याला गुडघेदुखीमुळं स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहावं लागलं. गेल्या वर्षभरात त्याच्या दुखापग्रस्त गुडघ्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. माझ्या शरीरानं मला स्पष्ट संकेत दिले आहेत, या शब्दांत फेडररनं आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या २४ वर्षांत मी दीड हजारांहून अधिक स्पर्धात्मक सामन्यांमध्ये खेळलो आहे. त्यामुळं स्पर्धात्मक कारकीर्दीला रामराम करण्याची ही योग्य वेळ आहे, हे मला कबूल करायला हवं, असंही फेडररनं म्हटलं आहे. टेनिसवर माझं प्रेम आहे आणि या खेळापासून मी दूर जाणार नाही, असं सांगून फेडररनं आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram