Ravindra Jadeja ruled out : जडेजाच्या उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत, आशिया चषकातून बाहेर

Continues below advertisement

टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाला गुडघ्याच्या दुखापतीमुळं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकातून माघार घ्यावी लागली आहे. जाडेजाच्या उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळं त्याला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. जाडेजाऐवजी डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आशिया चषकातल्या सामन्यात रवींद्र जाडेजानं २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी उभारून भारताच्या पाकिस्तानवरच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळं जाडेजाच्या माघारीनं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram