Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या खांद्याला खांदा भिडवत महिलाही करणार नेमबाजी

Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्री - पुरूष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून भिडतील असे क्रिडाप्रकार सहसा पाहायला मिळत नाहीत. परंतु रायफल शूटींग हा एक असा प्रकार आहे ज्यात आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या खांद्याला खांदा भिडवत महिलाही नेमबाजी करताना दिसणार आहेत. त्याचीच तयारी म्हणून पनवेलमध्ये लक्ष्य कपचं आयोजन करण्यात आलं आहे. कर्नाळा स्पोर्टस अकादमीच्या माध्यमातून भारताची आघाडीची नेमबाज आणि ऑलिम्पियन सुमा शिरूर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचं हे यंदाचं बारावं वर्ष असून देशातील अग्रमानांकीत 20 शूटर्सना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. या स्पर्धेची माहिती देण्याकरता मुंबईतील प्रेस कल्बमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथं स्वत: सुमा शिरूर यांनी माध्यमांना या स्पर्धेची माहिती आणि रूपरेषी समजावून सांगितली.
 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram