ICC T20 WC 2021 : पाकिस्तान संघ ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सलग पाचवा विजय साजरा करण्यासाठी सज्ज...
abp majha web team
Updated at:
07 Nov 2021 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाबर आझमचा पाकिस्तान संघ ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सलग पाचवा विजय साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या विश्वचषकाच्या दुसऱ्या गटात पाकिस्तानचा सामना आज स्कॉटलंडशी होत आहे. पाकिस्ताननं या गटातल्या सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाची ताकद लक्षात घेता, स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानचाच विजय अपेक्षित आहे. स्कॉटलंडचाही हा गटातला पाचवा सामना असून, पहिल्या चारही सामन्यांमध्ये स्कॉटलंडला हार स्वीकारावी लागली आहे. त्यामुळं आजचा सामना हा पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीची पूर्वतयारी ठरावा.