Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला विद्या प्रतिष्ठानकडून 12 लाखांचं इनाम | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला 12 लाख रुपयांचं इनाम देण्यात आलं. भविष्यातल्या उच्च प्रशिक्षणाची तरतूद म्हणून ही रक्कम त्याला देण्यात आली आहे. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त विठ्ठल मणियार यांच्य़ा हस्ते 12 लाख रुपयांचा धनादेश हर्षवर्धनच्या हाती सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी त्याचे प्रशिक्षक काका पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे उपस्थित होते. नजिकच्या काळात उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळकेचंही रोख इनामानं कौतुक करण्याचं आश्वासन पवारांनी दिल्याचं काका पवारांनी सांगितलं.
Continues below advertisement