Karate Record | एका मिनिटात 217 पंच, कराटेपटूच्या विक्रमाची लिम्का बुकात नोंद | अंबरनाथ | ABP Majha

अंबरनाथच्या कराटेपटूने एका मिनिटात सर्वाधिक पंच मारण्याचा जागतिक विक्रम रचलाय. त्याच्या या विक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद झालीये.
रोहित भोरे असं या कराटेपटूचं नाव आहे. रोहितने कराटेच्या चुदान झुकी म्हणजेच छातीवर पंच मारण्याच्या प्रकारात हा विक्रम केला. विक्रम करण्यासाठी त्याला एका मिनिटात केवळ १५० पंच मारण्याचं लक्ष्य देण्यात आलं होतं, मात्र त्याने एका मिनिटात तब्बल २१७ पंच मारत विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. या विक्रमासाठी अंबरनाथमधील पोलीस, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक यांच्यासह नागरिक आणि कराटेचे खेळाडू उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola