Women's Hockey Team India : ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाचं कांस्यपदक हुकलं,ग्रेट ब्रिटनकडून पराभव

Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला.  इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola