Khashaba Jadhav | पहिलं ऑलिम्पिकचं पदक मिळवणाऱ्या खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्काराने गौरव कधी होणार?

Continues below advertisement

ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला पहिलं पदक मिळवून देणारे मराठमोळे पैलवान खाशाबा जाधव हे पद्म पुरस्कारापासून अजूनही वंचित का, हा सवाल एबीपी माझानं पहिल्यांदा विचारला होता तो 25 एप्रिल 2017 रोजी. मग 29 डिसेंबर 2018 रोजी हाच प्रश्न आम्ही भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांना पुण्यात विचारला. केंद्रात भाजप सरकार पुन्हा आलं की, आम्ही खाशाबा जाधवांवरचा अन्याय नक्की दूर करु असं आश्वासन ब्रिजभूषण यांनी त्या वेळी दिलं होतं. पण खाशाबांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी आता जाधव कुटुंबियांसह कुस्ती आणि राजकारणातल्या धुरिणांनी कंबर कसली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram