Tokyo Olympics 2021:टोकियो ऑलिम्पिकवर चक्रीवादळाचं सावट,नेपार्तक वादळामुळं अनेक स्पर्धा पुढे ढकलल्या
Continues below advertisement
कोरोनामुळे आधीच संकटांचा सामना करणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवर आणखी एक संकट घोंघावतंय. जपानमध्ये नेपार्तक वादळ होण्याची शक्यता असून त्याचा ऑलिम्पिक स्पर्धेवरही परिणाम होऊ शकतो. वादळाच्या इशाऱ्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडूही धास्तावले आहेत. पण यजमान जपाननं त्यांना चिंता करू नका असं सांगत दिलासा दिलाय. हे मध्यम श्रेणीचं उष्णकटिबंधीय वादळ आहे, असं जपाननं म्हटलंय. ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी, नौकानयन स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असला तरी अन्य खेळांच्या वेळेत बदल करणार नाही असं आयोजकांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement