Tokyo Olympics 2020 : 4 दशकांनंतर चक दे इंडिया.. पंतप्रधान मोदी यांनी फोनवरुन साधला खेळाडूंशी संवाद
ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं. भारतीय संघानं अटितटीच्या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आलेल्या फोनमुळे सर्व खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी फोनवर होते आणि त्यांनी आजच्या विजयाबद्दल संघाचं कौतुक केलं.