Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियाची कमाल, उपांत्य फेरीत धडक
Tokyo Olympics 2020 LIVE : भारताचा पैलवान बजरंग पूनियानं क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त डाव टाकत इराणच्या पैलवानाला अक्षरशा आस्मान दाखवलं. प्री क्वार्टरमध्ये अटीतटीच्या सामन्यात रोमांचक विजय मिळवल्यानंतर बजरंगनं क्वार्टर फायनलमध्ये समोरच्या पैलवानाला लोळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. बजरंग आता पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. बजरंग पूनियानं एकाच मूव्हमध्ये विरोधी पैलवानाला चित केलं. इराणच्या मुर्तजाला हरवून तो सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आजच त्याचा सेमीफायनलचा मुकाबला होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासून बजरंग पूनियाला पदकाचा दावेदार मानला जात आहे. बजरंग पूनियाकडे भारताला कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.
बजरंगनं प्री क्वार्टर फायनलमध्ये किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवेला हरवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या प्री क्वार्टर फायनल सामन्यात विजय मिळवत बजरंग क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला. किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवे विरुद्धचा हा सामना फारच रोमांचक झाला. या कुस्तीत दोघांनी 3-3 अशी बरोबरी केली मात्र त्याआधी बजरंग पूनियानं दोन प्वाईंट घेतले होते. त्यामुळं त्याला विजयी घोषित करण्यात आलं.