Tokyo Olympic 2020 : भारताला Ravi Kumar Dahiya कडून 'सुवर्ण'यशाची अपेक्षा ABP Majha

Continues below advertisement

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आज चांगलं यश मिळालं आहे. बॉक्सिंगमध्ये लवलीनानं कांस्यपदक मिळवल्यानंतर आता कुस्तीत रवि दहियानं अंतिम फेरी गाठली आहे. रविच्या या विजयानं भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. कझाकिस्तानच्या पैलवानाला सेमीफायनलमध्ये नमवत त्यानं अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरी रविनं विजय मिळवला तर भारताला सुवर्णपदक मिळेल, जर तो तिथं पराभूत झाला तरी रौप्यपदक निश्चित झालं आहे. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं हे यश मिळवलं आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियानं आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता दीपक पुनियाच्या कामगिरीकडेही लक्ष लागून आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram