TOKYO 2020 : मनीष नरवालला 'सुवर्ण', सिंघराजला 'रौप्य', Paralympic नेमबाजांचा डबल धमाका
Tokyo Paralympic 2020 : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आजच्या दिवसाची सुरुवात सोनेरी झाली आहे. 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदकासह रौप्यपदक देखील मिळालं आहे. भारताच्या मनीष नरवालनं 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे तर सिंहराजनं याच प्रकारात रौप्यपदक मिळवून दिलं आहे. सिंहराज अधानानं याआधी कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं होतं. आता त्यानं रौप्यपदक जिंकून आपलं दुसरं पदक निश्चित केलं आहे.
Tags :
Tokyo Medal Tally India Matches India Medal Tokyo Olympics Schedule Paralympic Tokyo Paralympic Tokyo Paralympic 2020 Manish Narwal Singhraj Tokyo Paralympic Schedule Paralympic Medal