Swapnil Kusale Family Celebration : स्वप्नीलचा विजयी कामगिरी; कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण, भावूक प्रतिक्रिया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आली आहे. स्वप्निलने महाराष्ट्रासह भारताची मान पॅरिसमध्ये अभिमानाने उंचावली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरच्या स्वप्निल कुसाळे याने मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्यानंतर भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. स्वप्निलने भारताला पुरुषांच्या 50मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली. त्याची रौप्य पदकाची संधी अवघ्या काही पॉइंट्सने हुकली. मात्र त्यानंतरही स्वप्निलने कांस्य पदक मिळवल्याने साऱ्या भारतात आनंदाची लाट पसरली आहे. स्वप्निल या प्रकारात पदक मिळवून देणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर त्याचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत स्वप्निलचं अभिनंदन केलं आहे.