Tokyo State Emergency : टोकियोमध्ये आणीबाणी लागू, प्रेक्षकांविनाच होणार ऑलिम्पिक स्पर्धा
Tokyo State Emergency: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी लागू (japanese Prime Minister announces state emergency Tokyo )करण्यात आली आहे. टोकियोमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं ऑलिम्पिक खेळांचा आनंद प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लुटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
Tags :
Japan Tokyo Olympics Tokyo Olympics Tokyo State Emergency Japanese Prime Minister State Emergency Tokyo