Chhatrasal Stadium Case | ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारविरोधात 'लूक आऊट' नोटीस जारी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांची पथकं रवाना झाली आहे. परंतु तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सुशील कुमार परदेशात पसार झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. देशाच्या सर्व विमानतळांवर ही माहिती देण्यात आली.
देशाची राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये 4 मे रोजी पैलवानांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडचा मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येमध्ये सुशील कुमारचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सागरच्या हत्येनंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसह उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पळून गेल्याचं म्हटलं जात होतं. त्याचं अखेरचं मोबाईल लोकेशन हरिद्वारमध्ये सापडलं आहे. त्यानंतर मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तो नेपाळमध्ये पळाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नेपाळच्या सीमेवरही बंदोबस्त आणि चौकशी वाढवली आहे.