ICC T20 WC 2021 : भारत पुन्हा Toss हरला, न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

Continues below advertisement

भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या 18 वर्षांत झालेल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडनं एकतर्फी वर्चस्व गाजवलंय. 2003 सालच्या वन डे विश्वचषकात सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतानं न्यूझीलंडला हरवलं होतं. पण त्यानंतर गेल्या अठरा वर्षात किवी संघ वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासह कसोटी विजेतेपद फायनलमध्येही टीम इंडियाला भारी ठरलाय. 2019 सालच्या वन डे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि मग यंदा कसोटी विजेतेपदाच्या अंतिम फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं आयसीसी स्पर्धांमधली न्यूझीलंडविरुद्धची पराभवांची मालिका टीम इंडिया खंडित करणार का? याचं उत्तर आपल्याला आज मिळणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram