Neeraj Chopra : लुसान डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राची दमदार कामगिरी, लीग जिंकणारा पहिला भारतीय

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने लुसान डायमंड लीगमध्ये दमदार कामगिरी केलीय. ८९.०८ मीटर भाला फेकत नीरजने लुसान डायमंड लीगचे जेतेपद पटकावलंय... अशी कामगिरी करणारा नीरज पहिला भारतीय ठरलाय... या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केलंय... स्नायूंच्या दुखापतीतून सावरत मैदानात उतरताच नीरजनं चमकदार कामगिरी सुरुच ठेवलीय. जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. परिणामी, त्याला बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola