Commonwealth Games 2022 मध्ये मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, गुरुराज पुजारीला कांस्य पदक
बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या संकेत सरगरने भारताच्या पदकाचं खाते उघडल्यानंतर वेटलिफ्टर्सनी पदकांचा चौकार मारलाय. वेट लिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक मिळालंय.. भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिलंय. मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात ही नेत्रदीपक कामगिरी केलीय. मीराबाई चानूच्या सुवर्ण कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत अभिनंदन केलंय.. याआधी महाराष्ट्रच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारतासाठी पदकांचे खाते उघडले. त्याने वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलोग्रॅम वजनी गटात ही कामगिरी केली. संकेत सरगरनंतर पुरुष वेटलिफ्टिंगच्या ६१ किलो वजनी गटात गुरुराजा पुजारी यानेदेखील कांस्यपदक मिळवलं. तर भारताच्या बिंद्यारानी देवीने महिलाच्या ५५ किलो वजनी गटात आणखी एका रौप्यपदकाची कमाई केलीय..