Khel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कार

Continues below advertisement

Major Dhyan Chand Khel Ratna Award 2024 : बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले जाणार आहे. क्रीडा मंत्रालयाने 2 डिसेंबर 2025 रोजी ही घोषणा केली. सर्व विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येईल. क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, क्रीडा पुरस्कारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण आणि तपासणी केल्यानंतर सरकारने खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे सरकारने मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मनू भाकरचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केले नव्हते, त्यामुळे वाद झाला होता. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 2 पदके जिंकून इतिहास रचला होता. एकाच ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धांमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तर हरमनप्रीत सिंगने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ होती. तर डी गुकेश हा काही आठवड्यांपूर्वीच बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. त्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविले होते. प्रवीण कुमारने पॅरालिम्पिकच्या T64 प्रकारातील उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 पॅरा ॲथलीट आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram